नवी मुंबई :- सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत आणि नेरूळ गावच्या सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन ठाण्यात शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या हस्ते सोमवारी रात्री झाले.
गतपाच वर्षात सिडको संचालक म्हणून नामदेव भगत यांनी केलेली कामे आणि नेरूळ गावच्या नगरसेविका म्हणून गतपाच वर्षात सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी केलेली कामे यांचा संयुक्त अहवाल जनतेच्या माहितीस्तव खासदार राजन विचारे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी कार्यअहवालावर नजर टाकताना खासदार विचारेंनी भगत दांपत्यांच्या लोकोपयोगी कामाची प्रशंसा केली. यावेळी नगरसेविका सौ. इंदूमती भगत, सुकुमार किल्लेदार, अमित भावसार उपस्थित होते.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवामध्ये हा कार्यअहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.