सानपाडा / वार्ताहर
23 मार्च 1931 साली भगत सिंग,सुखदेव आणि राजगुरू या तीन क्रांतीविराना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तेव्हापासून 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून मोठ्या भावपूर्ण वातावरणात देशात साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टीचे सदस्य महेश मढवी यांनी आपल्या सानपाडा सेक्टर 5 येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात शहीद दिवस मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरा केला.
यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सचिन खाडे,सानपाडा – जुईनगर मंडळ अध्यक्ष श्रीमंत जगताप,मंडळ सरचिटणीस रमेश शेटे,मा.नगरसेवक शंकर माटे,अशोक विधाते,नवनाथ पोळ,प्रमिला मढवी,वृषाली चव्हाण तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून आणि शहिदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.त्यानंतर उपस्थित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शहिदांच्या प्रतिमेवर फुले वाहून त्यांना भापूर्ण श्रद्धांजली वाहिली.तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यानी शहीद दिवसाचे महत्व सांगून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.