सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महापौर सागर नाईक यांच्या महापौरपदाच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा आढावा घेणार्या या कार्य अहवालाचे प्रकाशन लोकनेते गणेश नाईक आणि संजीव नाईक यांच्या हस्ते सोमवार, दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी संपन्न झाला.
त्याप्रसंगी स्वत: महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक रविंद्र इथापे, गणेश भगत, संजय पाथरे, किस्मत भगत, ऍड. बनसोडे आदि मान्यवर उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेने, लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईच्या सवारगीण विकासकार्याला गतीमानता देता आली असे नमूद करीत महापौर सागर नाईक यांनी याकामी संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांचे अनमोल सहकार्य लाभले असल्याचा विशेष उल्लेख केला. या कालावधीत सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त तसेच सर्व अधिकारी कर्मचारीवृंद यांचे त्याचप्रमाणे सर्व नागरिकांचा मौलिक सहयोग लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
लोकनेते गणेश नाईक यांच्या संकल्पनेतील शहर घडविण्यासाठी त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे २० वर्षापैकी महापौरपदाच्या ५ वषारच्या कालावधीत कोणतीही करवाढ करण्यात आली नाही, अशी १० वर्षे झाली. अशीच पुढील १० वर्षे कोणतीच करवाढ केली जाणार नाही. मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सुविधांचा दर्जा कायम उंचावत ठेवला आणि ठेवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई देशभरात नावाजली जात असताना यापुढील काळात नवी मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहयोगाने लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतीमान कार्यवाही करण्यात येईल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.