नवी मुंबई – नेरूळ येथील डेनिस इलेव्हनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ओव्हर आर्म क्रिकेट सामना रंगतदार ठरला. या स्पर्धेत जुईनगर इलेव्हनचा संघ विजेता ठरला.
नेरूळ सेक्टर 2 येथील शिरवणे विद्यालय समोरील मैदानात रविवारी डेनिस इलेव्हनच्या वतीने ओव्हर आर्म क्रिकेट सामन्यांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यात नेरूळसह नवी मुंबईतील एकूण 8 संघांनी सहभाग नोंदविला होता. क्रिकेट सामन्यांचे उद्घाटनप्रसंगी नेरूळमधील शिवसेना विभागप्रमुख गणेश घाग, शिवसेनेचे नगरसेवक रतन मांडवे, माजी नगरसेवक रंगनाथ औटी, प्रभागातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. नवी मुंबईचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी या क्रिकेट सामन्यांना भेट देवून आयोजकांना व खेळाडूंचा उत्साह वाढविला. या क्रिकेट सामन्यांमध्ये जुईनगर इलेव्हन हा संघ विजेता ठरला. फायटर बॉइज कोपरी या संघाला उपविजेतावर समाधान मानावे लागले.विजेत्या संघाला आयोजकांकडून रोख रक्कम 25,000 रुपये,बॅट,आणि चषक देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या संघाला आयोजकांकडून यांच्या हस्ते रोख रक्कम 12,500 रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. जुईनगर इलेव्हन संघाचा रवी हा क्रिकेट सामन्यांमध्ये मालिकावीर तसेच उत्कृष्ठ गोलंदाज ठरला. आयोजकांकडून रवीला आकर्षक बक्षिस देऊन गौरविण्यात आले.तसेच फायटर बॉइज कोपरी संघाचा कल्पेश हा उत्कृष्ठ फलंदाज ठरला.कल्पेशला आयोजकांकडून आकर्षक बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.