सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान ,जांभळी नाका येथे आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सोमवारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या सौ.अर्पिता तांडेल, श्री. उमाकांत नाखवा, कु.रिद्धी कोळी, श्री. राजेश खारकर, कु. समीक्षा कोळी, श्री. परेश नाखवा, श्री. प्रकाश ठाणेकर, श्रीमती निर्मला कोळी, सौ. भारती कोळी, श्री. महादेव मढवी, श्रीमती उमा पाटील, श्री. निळकंठ पाटील आदी कोळी-आगरी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेनचे उपनेते दशरथ पाटील, आमदार सुभाष भोईर, उपजिल्हाप्रमुख व नगरसेवक (मीरा-भाईंदर) प्रभाकर म्हात्रे, मनोज मयेकर, नवी मुंबई विरोधी पक्ष नेत्या सौ. सरोज पाटील, नवी मुंबई शहर प्रमुख सुरेश म्हात्रे, श्री. व्दारकानाथ भोईर, ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती, दशरथ पालांडे, मा. नगरसेवक भास्कर पाटील, नवी मुंबई युवा अधिकारी प्रवीण म्हात्रे, नगरसेविका नंदिनी राजन विचारे, नगरसेवक मंदार विचारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या ठाणे, नवी मुंबई व मीरा भाईंदर भागातील आगरी – कोळी समाजाचे नगरसेवक नरेश मणेरा, सुधीर भगत, उमेश पाटील, संजय तरे, नवी मुंबईचे नगरसेवक नामदेव भगत, शिवराम पाटील, मनोहर मढवी, सोमनाथ वास्कर व ठाणे नगरसेविका- सौ. महेश्वरी तरी, अनिता गौरी, बिंदू मढवी, अवंतिका पाटील, शारदा पाटील, मंगला कळंबे, विजया लासे, सुजाता पाटील, नवी मुंबई नगरसेविका कोमल वास्कर, सिंधू नाईक, विनया मढवी, लता कोटकर व पक्षाचे पदाधिकारी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले रात्र-दिवस जनतेची सेवा करण्याची शक्ती दे, शेतकर्यांच्या आत्महत्या थांबुन देत, जनतेला चांगले दिवस येऊ देत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधानसभेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देत हे एकच साकडे देवीकडे मागितले असे आपल्या भाषणात सांगितले. विकास कामांबरोबरच गेली सात वर्ष उत्सवाच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे खासदार राजन विचारे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगून महाराष्ट्रात अशा प्रकारचा सुंदर उत्सव मी प्रथमच पाहिला असल्याचे त्यांनी सांगितले.