नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव इथल्या कोकणगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात 5 डॉक्टर जागीच ठार झाले. अपघातात एक जण जखमी झाला आहे. मृत सर्व डॉक्टर हे नाशिकचे राहणारे होते. नाशिकहून पिंपळगावला जाताना डॉक्टरांच्या टवेरा गाडीला टेम्पोची जबर धडक बसली आणि ही दुर्घटना घडली.
चुकीच्या बाजूने येणार्या टेम्पोने कोकणगाव फाट्यावर डॉक्टर प्रवास करत असलेल्या टवेरा समोर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की टेवरातील पाच डॉक्टरांना जागीच आपला जीव गमवावा लागला. डॉ. संजय तिवारी, डॉ. सुरेश पाटील, डॉ. शेळके, डॉ. चद्रशेखर गांगुर्डे आणि डॉ. कुंदन जाधव या पाच डॉक्टरांचा अपघातात मृत्यू झाला. तर डॉ. उमेश भोसले अपघातात जखमी झाले.