पुणे – कॉर्पोरेशन बँकेने महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात जुन्या रूपी बँकेचे अधिग्रहण करण्याची योजना सध्या नसल्याचे सांगितले आहे.
“सध्या रूपी बँक घेण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव नाही” असे कॉर्पोरेशन बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्यांने सांगितले. रूपी बँक महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात जुनी सहकारी बँक आहे. बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर 36 शाखा असून सध्या बँकेला 652 कोटी रुपयांचा तोटा झालेला आहे.
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या दोन वर्षांपासून त्यावर प्रशासक नेमलेला आहे. पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक देखील रूपी बँकेचे अधिग्रहण करण्याच्या शर्यतीत होते. परंतु त्यांनी त्यातून माघार घेतली आहे. कॉर्पोरेशन बँकेच्या या निर्णयामुळे आता रूपी बँकेचे 6.30 लाख ठेवीदार प्रभावित होणार आहेत.