संजय बोरकर
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाकरीता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हॅट्ट्रीकवीर नगरसेविका सौ. नेत्रा शिर्के यांनी तर शिवसेना-भाजपाकडून सानपाड्यातील शिवसेनेच्या नगरसेविका सौ. कोमल वासकर यांनी निवडणूक अर्ज भरला आहे.
स्थायी समितीमध्ये 16 सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 8, शिवसेनेचे 6 व भाजपा-काँग्रेसचे प्रत्येकी 1 सदस्य आहे. नेत्रा शिर्के यांचा उमेदवारी अर्ज भरताना ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनवणे, महापालिका सभागृहनेते जयवंत सुतार, नगरसेवक रविंद्र इथापे, अपर्णा गवते, काँग्रेसचे निशांत भगत, विजय वाळूंज यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्र्रेसचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या नगरसेविका सौ. कोमल वासकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना-भाजपा युतीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्र्रेस व काँग्रेसचे संख्याबळ 2 जास्त आहे.