संजय बोरकर
नवी मुंबई : वाशीतील शिवाजी चौक परिसरात केंद्रातील मोदी सरकारने भारतवासीयांना मृगजळीत “अच्छे दिन”चे स्वप्न दाखवून भ्रमनिरास केल्यामुळे मंगळवारी सकाळी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली “अच्छे दिन”ची प्रतिकात्मक प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अच्छे दिनच्या बॅनरला पुष्पहार अर्पण करुन व मेणबत्या पेटवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोबत जोडलेल्या मुद्यांच्या आधारे दशरथ भगत यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले व सर्व उपस्थितांनी 2 मिनिट स्तब्ध उभे राहून तथाकथित अच्छे दिनला श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या समवेत अविनाश लाड (उपमहापौर-नमुंमपा), नगरसेविका सौ. अंजली वाळुंज, वैजयंती भगत, हेमांगी सोनावणे, पुनम पाटील, अनिल कौशिक (माजी उपमहापौर), निशांत भगत (अध्यक्ष – ठाणे लोकसभा यु.काँ), विजय वाळुंज(अध्यक्ष – बेलापूर विधानसभा यु.काँ), दिपक पाटील (माजी नगरसेवक), सुरेश नायडू -उपाध्यक्ष, सरचिटणीस – प्रकाश थळी, संजय यादव, निजाम अली शेख, सुधीर पाटील, सौ. रामेश्वरी पाटील, सौ. संध्या भोईर, सौ. पूजा जैन, कु. लक्ष्मी जोशी हे सर्व मान्यवर व इतर साधारणतः 100 कार्यकर्ते उपस्थित होते.