ठाणे : गुर्जर आंदोलनांमुळे पश्चिम रेल्वे मार्गाला चांगलीच झळ बसत आहे. दिल्ली-मुंबई मार्गावरुन धावणार्या अनेक गाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे पश्चिम रेल्वेचे दिवसाला 15 कोटीहून अधिक नुकसान होत आहे.
आंदोलनामुळे 15-20 गाड्या रद्द करण्यात येत असून त्यामुळे 12-15 हजार कमी महसूल पश्चिम रेल्वेला मिळत असल्याची माहिती पश्रि्चम रेल्वे विभागातील अधिकार्यांनी दिली.
आंदोलनामुळे केवळ पॅसेंजर गाड्याच रद्द करण्यात येत नसून अनेक मालगाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक मालगाड्या रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पाच टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून गुर्जर समाजाचे रेल रोको आंदोलन सुरु आहे. आतापर्यंत या आंदोलनामुळे ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, गोल्डन टेम्पल मेल, मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली दुरांतो एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-फिरोझपूर जनता एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले.