विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंनी दिली प्रशासनाला समज
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : महानगरपालिकेचे नेरूळ (पूर्व) येथील माताबाल रूग्णालय येत्या दोन महिन्यात सुरू न केल्यास शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा ईशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेते व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी दिला.
विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून विजय चौगुले यांनी पाहणी अभियानातून नवी मुंबईतील विविध भागांना भेटी देत नागरी समस्यांचा व नागरी सुविधांच्या उपलब्धतेचा आढावा घेत आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंनी मंगळवारी दुपारी आरोग्य खात्यातील रूग्णालयीन सुविधेचा आढावा घेण्याचा उपक्रमाचा एक भाग म्हणून बेलापुर येथील रूग्णालय व त्यानंतर नेरूळ येथील माता बाल रूग्णालयाचा आढावा घेतला.
नेरूळच्या रूग्णालयाचा पाहणीदौरा करताना चौगुलेंनी संपूर्ण रूग्णालयाची पाहणी केली. रूग्णांची संख्या, कर्मचारी संख्या बळ, रूग्णालयीन व्यवस्थेची सुसज्जता, औषधांचा साठा यासह साफसफाई आदींचा आढावा घेतला. रूग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचार्यांशी सुसंवाद साधून रूग्णालयीन कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.
केवळ ओपीडी चालविण्यासाठी रूग्णालयावर ईतका खर्च करण्यात आला असून सर्वसामान्य गोरगरीब करदात्या नवी मुंबईकरांच्या श्रमातून या रूग्णालयाची निर्मिती झालेली आहे. येत्या दोन महिन्यात हे रूग्णालय कार्यान्वित न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून नवी मुंबईकरांकरीता हे रूग्णालय आम्हाला खुले करून द्यावे लागेल असा ईशारा यावेळी विजय चौगुले यांनी दिला.
यावेळी चौगुले यांच्यासमवेत शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शिवसेना पालिका गटनेते सोमनाथ वास्कर, नगरसेवक रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर सुतार, विशाल ससाणे, बहाद्दूर बिस्ट, काशिनाथ पवार, नगरसेविका ॠचा पाटील, माजी नगरसेवक रतन मांडवे, दिलीप घोडेकर, शिवसेना पक्षाधिकारी सुमित्र कडू, रामचंद्र पाटील आदी या पाहणी अभियानात सहभागी झाले होते.