मुंबई – मुंबई शेअर बाजारात आज (मंगळवार) सलग दुसर्या दिवशी घसरण सुरुच राहिली आहे. आज सकाळी बाजाराची नकारात्मक सुरूवात झाली.
आज देखिल (मंगळवार) बाजार बंद होईपर्यंत शेअर बाजार कोणतेही सकारात्मक वातावरण दिसले नाही. आज अखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 27 हजार 531.41 पातळीवर व्यवहार करत -112.47 अंशांनी म्हणजे -0.41 टक्क्यांनी कोसळून बंद झाला आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली होती. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी 313.62 अंशांनी कोसळून 27 हजार 643.88 पातळीवर बंद झाला होता. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांकानेदेखील आज 8400 ची पातळी मोडली आणि बाजार बंद होतेवेळी निफ्टी 31 अंशांनी घसरून 8 हजार 339 पातळीवर व्यवहार करत होता. आज (मंगळवार) मुंबई शेअर बाजारात कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, मारुती आणि बजाज ऍटो यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते तर ओएनजीसी, वेदांत, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि रिलायन्स यांचे शेअरमध्ये घसरून झाली होती.