बँकॉक : मलेशियन एअरलाइन्स कंपनीला अधिक फायद्यात आणण्यासाठी कंपनीतील २० हजार कर्मचार्यांची नोकरी धोक्यात आली आहे. तर यातील एक तृतीयांश कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मलेशियन एअरलाइन्सने आपल्या कंपनीतील २० हजार कर्मचार्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्याचा विचार करत आहे.
त्यातील एक तृतीयांश कर्मचार्यांना कायमचे काढून टाकण्यात येणार आहे. तर दोन तृतीयांश कामगारांना नविन करारानुसार पुन्हा कामावर घेणार असल्याचे समजते.
प्राईजवॉटरहाऊसकूपर्स कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष मोहम्मद फयाज आजमी यांची एअरलाइन्सच्या मुख्य व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. कंपनीला अधिक फायद्यात आणण्यासाठी त्यांनी हा कठोर निर्णय घेतला असल्याचे समजते. या नव्या करारानुसार कंपनीतर्फे फक्त देशांतर्गत वाहतूक सेवा पुरवण्यात येणार आहे.
यामुळे विमान सेवेत अथवा विमानाची वेळ आणि आरक्षणात कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे मलेशियन एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तोफ म्युलर यांनी सांगितले.
मलेशियन एअरलाइन्सच्या दोन विमानांना २०१४ मध्ये अपघात झाले. यामुळे कंपनीने आपल्या कामकाजात बदल करण्याचे ठरवले आहे.
गेल्यावर्षी आठ मार्चला कौलालंपूर ते बिजिंग दरम्यान धावणार्या एमएच३७० या विमानाला झालेल्या अपघातात २३९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्याच्या चार महिने आधी एमएच१७ या विमानाला युक्रेनमध्ये अपघात झाला. त्यात २८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.