ठाणे : मुंबई सीएसटीहून ठाणे येथे जाणारी लोकल कुर्ला स्टेशनवर न थांबल्याने अनेक प्रवासी गोंधळले आणि त्यांनी चक्क धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेत 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींवर उपचार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
मुंबई सीएसटीहून सुटलेली ठाणे लोकल दुपारी 11च्या सुमार कुर्ला स्टेशनवर पोहोचली. कुर्ला येथे उतरण्यासाठी अनेक प्रवासी दरवाजात उभे होते. मात्र ही लोकल स्टेशनवर थांबली नाही. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी थेट धावत्या गाडीतून उडी मारली. या प्रकारात 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.