नवी मुंबई :- जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत व ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा एनएसयुआयच्या वतीने राजीव गांधी जॉगर्स पार्क, हिरानंदानी रुग्नालयसमोरिल परिसर स्वच्छ करण्यात आला व जनतेमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रमात मनोज महाराणा- उपाध्यक्ष ठाणे जिल्हा एनएसयुआय, ओमकार कोल्हे- सरचिटणीस ठाणे जिल्हा एनएसयुआय, सागर जगताप- सरचिटणीस ठाणे जिल्हा एनएसयुआय, सुशांत लंबे- सरचिटणीस ठाणे जिल्हा एनएसयुआय, अर्चना कुंभार- सरचिटणीस ठाणे जिल्हा एनएसयुआय, ओवेस शेख – सचिव ठाणे जिल्हा एनएसयुआय, निशा धोत्रे- सचिव ठाणे जिल्हा एनएसयुआय, त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव कॉलेज मधील एनएनच्या विद्यार्थ्यांचा ही सहभाग होता. यामध्ये मयुर अमृतसागर, शुभम पवार, मनोज गायकवाड़, आकाश घाडगे, धनश्री साळुंखे, मयूरा सोनावणे, मंजुश्री दुराफे, अस्मिता पाटील, वनिता पाटील हे विद्यार्थी सहभागी झाले होते.