संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : दैनिक लोकदृष्टीचा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. 13 जुन रोजी वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते होत असून समारंभाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय नाट्य समेलनाच्या अद्यक्षा ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री फैय्याज या भूषविणार आहेत.
सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेतील सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून बेलापुरच्या भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, विरोधी पक्षनेते विजय चौगुले आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून नामवंत व्याख्यात्या अॅड. जयश्रीताई शेळके, सुप्रसिध्द लेखिका डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवी मुंबईत पत्रकारिता करणार्या महिला पत्रकारांचादेखील विशेष सत्कार करण्यात येणार आहे. वर्धापनदिन सोहळ्यात नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दै. लोकदृष्टीचे संपादक दिनेश पाटील यांनी केले आहे.