अहमदनगर : जामखेड येथील कारागृहाच्या छताची कौले काढून चार अट्टल गुन्हेगार फरार झाले.
तासगाव येथील लॉकअपमधून तीन अट्टल दरोडेखोर पळून गेल्याचा प्रकार घडून 10 दिवस होत नाही तोच आता अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील उप कारागृहाच्या छताची कौले काढून चार अट्टल गुन्हेगार फरार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या तालुक्यातच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जामखेडमध्ये होत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यात गायब झालेली वीज या दुहेरी संधीचा फायदा घेत हे चार गुन्हेगार कारागृहाच्या छतावरील कौले काढून पसार झाले.
माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या तासगाव पोलीस ठाण्यात 31 मे रोजी पोलीस अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीत तेथील पोलीस गुंग झाल्याची संधी साधून लॉकअपमधून तीन अट्टल दरोडेखोर पळून गेले होते