तबिल्सी : जॉर्जियाची राजधानी असलेल्या तबिल्सी येथे मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराचा फटका प्राणीसंग्रहालयालाही बसला आहे. अनेक प्राणी पुरामुळे प्राणीसंग्रहालयाबाहेर आले असून वाघ, सिंह, पाणगेंड्यासह अनेक जंगली प्राणी जॉर्जियाच्या रस्त्त्यावर मोकळे फिरत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, शहरातील मुख्य चौकाच्या ठिकाणी पाणगेड्यांला ताब्यात घेण्यात आले. विशेष पथकाच्या मदतीने काही प्राण्यांना पकडण्यात आले आहे. तर इतर प्राण्यांचा शोध घेतला जात आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या मोकळ्या प्राण्यांनी कोणावर हल्ला केल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस आणि वार्याचा जोरदार तडाखा तबिल्सी शहराला बसला. पुरामुळे तेथील अनेक घरे उध्दवस्त झाली आहे. आतापर्यंत १० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.