पालघर : विक्रमगडजवळ एसटी आणि टेम्पोमध्ये धडक होऊन त्यात एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमींना मनोर ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पालघरहून रविवारी सकाळी ७ वाजता सुटलेली पालघर-नाशिक-शिरपूर एसटी बस आणि जव्हारहून मनोरकडे जाणार्या टेम्पोची विक्रमगड तालुक्यातील बांगरचोळा गावाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात टेम्पोमध्ये पुढे बसलेला पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला तर एसटी व टेम्पोतील असे एकूण पाच प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. या सर्वांना मनोर ग्रामिण रूग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत पोलीस कर्मचार्याचे नाव नरेश गोपाळ पवार असे आहे. जव्हार तालुक्यातील जांभूल विहीर येथे राहणारे नरेष पवार हे वसई-विरार महानगरपालिकेच्या आजच्या मतदानाच्या बंदोबस्तासाठी सकाळीच टेम्पोतून डयुटीवर जाण्यासाठी प्रवास करीत होते परंतू अपघातात त्यांचा दुदैवी अंत झाला.