संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : कल्याणहून नवी मुंबईकडे प्रवास करणार्या प्रवाशांना ठाणे मार्गे न येत नवीन कळवा – ऐरोली उन्नत मार्गाच्या तांत्रिक बाबीच्या तपासणीसाठी अभियांत्रिकी फिजिकल सर्व्हे सुरु करण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर कामाच्या निविदा काढण्यात येतील व येत्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल असे आश्वासन एमआरव्हीसी चे अध्यक्ष प्रभात शहाई यांनी दिले आहे. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने नवीन कळवा – ऐरोली उन्नत मार्गाला मंजुरी मिळाली असून अर्थसंकल्पामध्ये या मार्गासाठी निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. त्यासंदर्भात या रेल्वे मार्गाच्या कामाला कधी सुरवात होणार याबाबत तसेच नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील सोयी सुविधांबाबत खासदार राजन विचारे यांनी बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीला एमआरव्हीसीचे अध्यक्ष प्रभात शहाई, सिडको मुख्य अभियंता दराडे, कार्यकारी अभियंता राजीव त्यागी, मुख्य अभियंता कुलभूषण, ए. डी. आर. एम. पश्चिम रेल्वे आदी उपस्थित होते.
तसेच सानपाडा येथील दत्तमंदिर जवळ धोकादायक असलेला एफओबीच्या कामास लवकरच सुरवात करावी अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी दिल्या आहेत. तसेच सिवूड रेल्वे स्थानकातील लोहमार्ग बदलण्याच्या कामाच्या बाबत चर्चा केली असता सिवूड व नवीन मार्गावरील रेल्वे स्थानकांना भेट देण्याचे आश्वासन एस. के. सूद यांनी या बैठकीत दिले.