नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 8 येथील डॉमिनोझ पिझ्झा हर्टच्या वाहनांनी पदपथ व्यापला असून स्थानिक रहीवाशांना पदपथावरून चालताही येत नाही. या अनधिकृत पॉर्किगबाबत महापालिका प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा मनसेचे विभाग अध्यक्ष रूपेश कदम यांनी दिला.
या समस्येबाबत मनसेचे रूपेश कदम सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. पालिका प्रशासनाकडून कारवाईबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने व समस्येचे निवारण होत नसल्याने महापालिकेला आंदोलनाचा हा ईशारा द्यावा लागला असल्याची माहिती विभाग अध्यक्ष रूपेश कदम यांनी दिली.
सोमवार, दि. 22 जुनला सकाळी महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकार्यांना याबाबत लेखी पत्र देवून रूपेश कदम यांनी आंदोलनाचा ईशारा दिला. यावेळी रूपेश कदम यांच्यासमवेत विभाग उपाध्यक्ष दिलीप शिर्के, शाखाध्यक्ष अमित शेलार, सौरभ कदम, दिनकर पगारे आदी उपस्थित होते.

