* भाजपा जोमात अंन विरोधक कोमात
कल्याण : गणेश पोखरकर
भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर यांनी बुधवार, दि. २४ जून रोजी मुंबईत प्रदेश कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे निश्चितपणे कल्याण शहरात भाजपची ताकद आणखीन वाढेल असा आशावाद यावेळी आमदार पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्याचप्रमाणे देवानंद भोईर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाज बांधवांच्या मदतीने आगामी काळात कल्याण शहरात भाजपा पक्ष आणखीन मजबूत करण्याचे एकमेव उद्दिष्ठ्य असेल, असे स्पष्ट केले. त्यांच्या प्रवेशामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपा जोमात आणि विरोधक कोमात अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.
दरम्यान देवानंद भोईर यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्ते निलेश देवानंद भोईर, सुरज तुकाराम भंडारी, उमेश काळे, राजेश पांचाळ, विनोद कोनकर, विजय भाकरे, विकी पवार, योगेश भंडारी, मोहित भंडारी, राजेश म्हात्रे, शाम जाधव, हरिभाऊ काळे, रुपेश नाभडे, योगेंद्र भंडारी, गणेश वासकर, गणेश काळण, अशोक शिंदे, पप्पू शिंदे, नागेश छत्रे, अविनाश भोईर, अश्विन पटेल, मधुकर मते, निलेश कोनकर, विलास खामकर, सुरज ढोणे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी आव्हाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.