मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 100 रूपयांच्या नोटांची सुरतक्षितता वाढवत विशेष प्रकारच्या नोटा चलनात आणल्या आहेत. या नवीन नोटांची रचना काही प्रमाणात बदलण्यात आली आहे. नोटेच्या नंबर पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल.
रिझर्व बँकेने महात्मा गांधी सीरीज – 2005 मध्ये नोटा चलनात आणल्या आहेत. ज्यात संख्यांचं स्वरूप बदलण्यात आलंय. नवीन नोटांवर दोन पॅनेल असतील ज्यात पहिली तीन अक्षरं अल्फा-न्युमरिक असतील तर उरलेल्या पॅनेलवरील संख्या वाढत्या आकारात असेल. या नव्या सुविधेमुळे सामान्यांना खर्या आणि खोट्या नोटांमधला फरक सहजच लक्षात येईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, 2005 पूर्वी छापल्या गेलेल्या नोटा बदलण्यासाठी आता अवधी वाढवून देण्यात आलाय. 31 डिसेंबरपर्यंत या नोटा तुम्ही बदलून घेऊ शकता.