मुंबई : सनी लिओनला आतपर्यंतच्या बॉलिवुड करिअरमधील सर्वात मोठा ब्रेक मिळाला आहे. सनी लिऑन लवकरच अक्षय कुमार सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सनी लिऑनने अक्षय कुमारसोबत चित्रपट ‘सिंह इज ब्लिंग’मध्ये एक छोटा कॅमिओ रोल केला आहे.
गेल्या महिन्यात सनी लिऑन गोव्यामध्ये आपल्या रिऍलिटी शो ‘स्प्लिट्सविला’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. याच दरम्यान अक्षय कुमारचा चित्रपट ‘सिंह इज ब्लिंग’ची शुटिंग गोव्यात सुरू होती. याचवेळी सनी लिऑनलाला अक्षयच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. सनीने या रोलसाठी झटकन होकार दिला.
सनीने गोव्यामध्ये शुटिंगवेळी एक ट्वीटही केले होते. या ट्विटमध्ये म्हटले की, आज मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले, जे करण्याचे मी स्वप्नही पाहिले नव्हते. हे नव्या कामासाठी पुढचे पाऊल आहे. चांगले आयुष्य जगते आहे.
सनी लिऑनने आतापर्यंत कोणत्या मोठ्या स्टारसोबत काम केलेले नाही. ती अक्षय कुमार सोबत दिसली तर तिच्या अभिनयाच्या करीअरसाठी चांगली गोष्ट आहे.