नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीचं महिन्याचं लाईट बिल किती असावं? २१ लाख १२ हजार ६७ रुपये. होय, हे एका महिन्याचं विजेचं बिल आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराचं.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी घराचं एप्रिल-मे महिन्याचं वीजबिल ९१ हजार रुपये असल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मोदी सरकारनंही यावर टीका केली. त्यानंतर हे वीज बिल आपल्या घराचं नसून आपल्या कार्यालयाचं आणि जनता दरबाराचं असल्याचा खुलासा ‘आप’कडून करण्यात आला.
त्यानंतर, ‘आप’चे नेते आशुतोष यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३, आरसीआर कॉम्प्लेक्स, पीएम हाऊस, नवी दिल्ली या पत्त्यावरचं म्हणजेच पंतप्रधानांच्या सरकारी घराचं वीज बिल सोशल वेबसाईट ’फेसबुक’वरून जाहीर केलंय. जुलै २०१५ चं हे बिल असून पंतप्रधानांचं एका महिन्याचं बिल आहे २१,१२,०६७ रुपये. याआधी पंतप्रधानांच्या घराचं बिल २८-५-२०१५ रोजी भरण्यात आलं होतं. हे बिल होतं ९६ लाख २४ हजार १५० रुपये.
महिन्यातील अर्ध्याहून अधिक काळ परदेश दौर्यावर असणार्या पंतप्रधानांच्या घराचं हे बिल पाहून भाजपलाचं आता यावर काय स्पष्टीकरण असेल, याकडे आता अनेकांचं लक्ष लागलंय.