रत्नागिरी : सध्या मासेमारीचा मुख्य हंगाम बंद आहे. पण खाडी आणि किनार्यांवर मात्र मच्छिमारीला सुरुवात झालीय. किनारपट्टी छोट्या मच्छिमारांनी भरलेली पाहायला मिळेल.
खोल समुद्रातली मासेमारी बंद असल्यामुळे मच्छिमारांना सध्या किनारपट्टीवर होणारी छोट्या माशांची मासेमारी उदरर्निवाहाचं मुख्य साधन ठरतं. मच्छिमार्यांना किनार्यावर वैशिष्ठ्यपूर्ण बोयर माशांसारखे अनेक मासे गळाला लागतायत.
किनार्यावर पकडलेले हे मासे किनार्यावरच्या वाळूतच साफ केले जातात आणि सर्व मासे एकत्र करून आसपासच्या बाजारात विकले जातात. छोट्या जाळ्यांच्या सहाय्यानं खाडी किनारीही झिल्याच्या सहाय्यानं कुर्ल्या पकडले जातात.
एक माणूस साधारणपणे ५० ते ६० कुर्ल्या मासे पकडतो. त्यातून त्याला दिवसाला हजार ते बाराशे रुपये उत्पन्न मिळतं. पावसाळ्यात ताऊज, पालू, बोयर, रेणव्या आणि कुर्ल्या हे खास चवीचे मासे खाण्यासाठी अनेकजण कोकण किनार्यावर येतात.