मणिला – मध्य फिलिपाईन्समध्ये गुरुवारी एका प्रवासी बोटीला अपघात झाला. या प्रवासी बोटीतून १७३ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी ३३ प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकार्यांनी दिली.
अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी सात बचावपथकाची जहाजे दाखल झाली असून मोठ्या प्रमाणात नागरिकांना सुरक्षित स्थळी पोचवण्यात येत आहे.
ओरर्मोट पोर्टपासून एक किलोमीटर अंतरावर ही बोट उलटली. ओरर्मोकहून कॅमोटच्या बेटाच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली.
बोटींच्या सुरक्षिततेकडे केले जाणारे दुर्लक्ष, त्यांची योग्य ती निगराणी न राखणे ही कारणे अनेकदा बोटींच्या दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरतात.