नवी मुंबई : वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या समस्यांबाबत मनसेने केलेल्या आग्रहपूर्वक मागणीनंतर नाट्यगृहातील गंभीर समस्यांबाबत संवेदनशीलता दाखवत मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बुधवारी विष्णूदास भावे नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौर्यात मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे व मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, शहर अभियंता मोहन डगांवकर, सहआयुक्त दिवाकर समेळ, कार्यकारी अभियंता सुभाष सोनवणे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौरा सुरु होण्याअगोदर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळेंनी आयुक्तांसमोर नाट्यगृहातील विविध समस्यांचा पाढा वाचला. यात प्रामुख्यांने प्रेक्षकांपासून ते कलाकारांच्या ग्रीनरूम, स्वच्छतागृह याची परिस्थिती कशी आहे याचे छायाचित्रासहीत आयुक्तांना दाखवून देण्यात आले. प्रेक्षक स्वच्छतागृहाच्या अवस्थेपासून ते आत नाट्यप्रयोग पाहताना उंदीर पर्यटनाच्या ते नाट्यगृहाच्या डासांपासून अखेरच्या घटका मोजणार्या पाण्याच्या कुलरपर्यतची पाहणी पालिका आयुक्तांनी या पाहणी दौर्यात केली. कलावंतांसाठी असणार्या ६ ग्रीन रूम व ५ कलाकार निवासी रूमची गंभीर परिस्थिती मनसेने यावेळी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. यातील अनेक रूमचे प्लास्टर पडलेे आहे. गाद्यांना १० ते १५ वर्षे झाली असून पंखेसुध्दा चालू स्थितीत नाहीत. एसीप्लॉटचीही पाहणी पालिका आयुक्तांनी केली.
या पाहणी दौर्यात गजाजन काळेंसमवेत विलास चव्हाण, निलेश बाणखिले, ऍड. कौस्तुभ मोरे, डॉ. आरती धुमाळ, अनिता नायडू, आप्पासाहेब कोठूळे, सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे, अभिजित देसाई यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.