मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत आणि सेलिना जेटली यांनी आपल्याविरोधात केलेली विधाने निरर्थक असून त्यांच्या विधानांनी आपल्यावर कोणताही फरक पडत नसल्याचे सनी लिओनने म्हटले आहे.
त्यांनी केलेली विधाने पूर्णपणे निरर्थक आहेत. हे अव्यवसायिकेतेचे लक्षण आहे. अशा प्रकारची वक्तव्ये करताना तुम्ही कोणत्याही अभिनेता अथवा अभिनेत्रीला पाहिले नसेल. हा त्या दोघींचा प्रॉब्लेम आहे. मला त्याची चिंता नाही असे सनीने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मी येथे चांगले काम करण्यासाठी आले आहे आणि कामांवर मी लक्ष केंद्रित करणार असल्याचेही सनी म्हणाली.
जिस्म २ मधून सनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रागिनी एमएमस २ या चित्रपटातही तिने भूमिका केली होती. तसेच विविध चित्रपटांच्या गाण्यांमध्येही तिने काम केले आहे.