लोकनेते गणेश नाईक शासनाला पाठविणार पत्र
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. मात्र या विद्यार्थ्याना शालेय दाखला आणि विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची कैफीयत नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्याकडे मांडली. यावर लोकनेते गणेश नाईक यांनी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाला निवेदन देणार असल्याची माहिती दिली.
तुर्भे येथे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे स्टोअर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी लोकनेते गणेश नाईक यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या प्रवेशाकरीता प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. नवी मुंबई महविद्यालयीन विद्यार्थ्याना मेरीट प्रमाणे प्रवेश दिले जात असताना ५० टक्के मॅनेजटमेन्ट (व्यवस्थापन) कोट्यातून प्रवेशासाठी देखील जागा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सरकारकडे पाठ पुरावा करणार असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. तुर्भे येथील शिवशक्तीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी महापौर सुधाकर सोनावणे, कार्यक्रमाचे आयोजक माजी स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, नगरसेविका राधा कुलकर्णी, नगरसेविका संगिता वास्के, नगरसेविका मुद्रिका गवळी त्याच बरोबर प्रभागातील नागरिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते गणेश नाईक यांनी यावेळी तुर्भे परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला.नागरिकांना भेडसाविणार्या समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी पालिका आयुक्त, महापौर, स्थायी समितीचे सभापती आणि संबंधित खातेप्रमुखांची एक बैठक घेऊन येथील समस्या तातडीने कशा सोडविल्या जातील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.