राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व कोलवाणी माता मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम
स्वयंम फिचर्स
नवी मुंबई : आधारकॉर्डापासून सारसोळे गावातील ग्रामस्थ व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशी आजही जे वंचित आहे, त्यांच्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५-८६ आणि सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ५ जुलै आणि सोमवार दि. ६ जुलै असे दोन दिवसीय आधारकॉर्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभाग ८५च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील या सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा या त्यांच्या प्रभागात सातत्याने नागरी समस्यांची पाहणी करण्याकरीता आणि नागरी सुविधांची उपलब्धता जाणून घेण्याकरता सातत्याने फिरत असतात. संततधार पावसात तुंबलेल्या गटारांची सफाई असो, चोकअप झालेल्या मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई असो, धुरीकरण असो वा मुषक नियत्रंणाचा कार्यक्रम असो सर्वच बाबतीत नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील स्वत: उपस्थित राहून महापालिका प्रशासनाकडून कामे करवून घेत असतात. प्रभागात फिरत असताना सारसोळे गावातील ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी विशेषत: महिलांनी आधार कॉर्डापासून आपण अद्यापि वंचित असल्याची तक्रार नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्याकडे केली. त्याचबरोबर शालेय मुलांना अगदी ३ वर्षापासूनच्या मुलांना आधारकॉर्ड आवश्यक असल्याची बाब कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांना या समस्येबाबत अवघ्या पाच दिवसात कार्यवाही सुरू झाल्याचे मला दिसले पाहिजे अशा सूचना केल्या.
प्रभागातील ग्रामस्थांची व रहीवाशांची गरज आणि नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांचे निर्देश यामुळे कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी युध्दपातळीवर प्रयास करत सारसोळे गावातील कोळीवाडा होळीमैदानानजिकच्या कोलवाणी माता मित्र मंडळाच्या कार्यालयात या दोन दिवसीय आधार कॉर्ड शिबिराचे आयोजन केले आहे.
रविवार आणि सोमवार या दोन दिवसात सकाळी १० ते सांयकाळी ७ वेळेत सारसोळे गावचे ग्रामस्थ आणि नेरूळ सेक्टर सहाचे रहीवाशी, महिला व बालक यांचे आधार कॉर्ड काढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ८५-८६ आणि कोलवाणी माता मित्र मंडळ-सारसोळे गाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
रविवारी दि. ५ जुलै सकाळी १० वाजता नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील आणि नगरसेविका सौ. जयश्रीताई ठाकूर यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या हस्ते या दोन दिवसीय आधार कॉर्ड शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या दोन दिवसीय आधार कॉर्ड शिबिराचा सारसोळे गावच्या ग्रामस्थांनी आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.