नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील विटावा नजीकच्या पटणी कंपनी परिसरातील रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करावी अशी सुचना आमदार संदीप नाईक यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना केली आहे. पटणी कंपनी मार्गाचा पाहणीदौरा बुधवारी (दि. १ जुलै) आमदार नाईक यांनी केला. या मार्गावर आवश्यक त्या सोयी-सुविधा येत्या सात दिवसात पुरविण्याचे आदेश त्यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांना दिले.
पटणी मार्गावर विद्युत दिवे बंद असतात. त्यामुळे अंधारातच मार्गक्रमण करावे लागते. रस्त्यावर ठिकठिकाणी खडडे पडले आहेत. पादचारी मार्गालगत अपघात रोखण्यासाठी बॅरीगेट नसल्याने नागरिक अपघातात जखमी होत असतात. या बाबी आमदार नाईक यांनी एमआयडीसीच्या अधिकार्यांच्या लक्षात आणून दिल्या.
पटणी कंपनी परिसरातील हा रस्ता एमआयडीसी विभागाच्या मालकीचा आहे. मुकुंद कंपनी येथून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणार्या आणि जाणार्या वाहनांची वर्दळ मोठी आहे. रिक्षादेखील मोठया संख्येने येत जाaaत असतात. वळण रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला अपघात वळण विषयी माहिती फलक नसल्याने रात्रीच्या वेळेत अनेक अपघात झाले आहेत. विद्युत खांब बंद असल्याने रात्रीच्या वेळेस अंधारात चाचपडतच येथील प्रवास करावा लागतो. त्याचा महिला प्रवाशांना विशेषतः त्रास होत असतो, ही बाब लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आमदार नाईक यांच्या निदर्शनास आणली. त्या अनुषंगाने आमदार नाईक यांनी बुधवारच्या पाहणी दौर्याचे आयोजन केले होते. या रस्त्यावरील पदपथांची लवकरात लवकर दुरुस्ती आणि गटारांची दुरुस्ती करावी, रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा गार्ड बसवावेत अशा सूचना आमदार नाईक यांनी याप्रसंगी उपस्थित एमआयडीसीच्या अधिकार्यांना केल्या.
एमआयडीसीच्या रस्ते बांधणी विभागाचे अभियंता एस.एन.उर्मिकर या पाहणी दौर्याप्रसंगी उपस्थित होते.