लंडन : विम्बल्डन स्पर्धेतील विजयरथ कायम ठेवत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
अव्वल सीडेड सायना-हिंगीसने १६ व्या सीडेड स्पॅनिशच्या अनाबेल मेडिना आणि अऱँटक्सा पॅरा या जोडीचा ६-४, ६-३ असा अवघ्या ६६ मिनिटांत पराभव केला.
सानिया आणि हिंगीसने प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस पहिल्या सेटमध्ये दोन वेळा आणि दुसर्या सेटमध्ये तीन वेळा भेदली. तर पहिल्या सेटमध्ये एकदा आणि दुसर्या सेटमध्ये दोनवेळा त्यांनी सर्व्हिस गमावली.