नवी मुंबई : सारसोळे ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असणार्या बामणदेव मंदीरापासून काही अंतरावर मागील बाजूस असलेल्या सारसोळेच्या खाडीअर्ंतगत भागात एक बेवारस होंडा सिटी गाडी (क्रं. एमएच-०४/ईक्यू ७२४५) गुरूवारी, दि.९ जुलै रोजी सकाळी आढळून आली. गाडी खाडीत टाकण्याचा प्रयास मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात घटकांनी केला असला तरी गाडीची चेसी जमिनीला टेकल्याने खाडीच्या पाण्यापासून उतारावर गाडी तशीच ठेवून अज्ञात घटकांनी पलायन केले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता पुन्हा नेरूळ-सानपाडा पोलीस हद्दीचा वाद चर्चेदरम्यान पहावयास मिळाला.
बुधवारी रात्री ही होंडा सिटी खाडीत ढकलून देण्याचा प्रयास अज्ञात घटकांनी केला असल्याचे पहाणीत स्पष्ट झाले आहे. वाहनचालक कोणीतरी तरबेज असण्याची शक्यता असून बामणदेवाच्या मंदीरापासून मागील काही अंतरावर असलेल्या खड्ड्यातून गाडी वाहनचालकांनी काढण्यात यश मिळविले. खाडीच्या भागात वाहनचालकाने पाण्यापासून काही अंतरावर अज्ञात घटकांनी गाडी न्यूट्रल करून खाडीत ढकलण्याचा प्रयास केला. तथापि गाडीची चेसी जमिनीला टेकल्याने गाडी खाडीच्या पाण्यापर्यत गेलीच नाही. पहाटे सारसोळेच्या मच्छिमारांना ही गाडी दिसताच त्यांनी तात्काळ सारसोळे गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यांना कळविण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच समाजसेवक मनोज मेहेर यांच्यांसह नवी मुंबई देशस्थ आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप खांडगेपाटील व सचिव सुजित शिंदे यांनी धाव घेतली. याप्रकरणी १०० क्रमांकावर संपर्क साधून खांडगेपाटील यांनी पोलिसांना या प्रकाराची कल्पना दिली. तसेच सानपाडा पोलीस ठाण्यात जावून खांडगेपाटील यांनी गाडीचे फोटो दाखवित घटनेची कल्पना दिली. ही घटनास सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच झाली असल्याचे खांडगेपाटील यांनी सानपाडा पोलीसांना सांगितले.