प.पू. श्री. इंद्रदेवजी महाराजांच्या (मथुरा निवासी) रसाळ प्रवचनाचा मिळणार भाविकांना लाभ
नवी मुंबई : आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने कोपरखैराणेत मथुरा निवासी युगप्रवर्तक राष्ट्रीय क्रांतीकारी संत श्री. इंद्रदेवजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 12 जुलै ते 18 जुलै या कालावधीत हा सप्ताह पार पडणार आहे.
पुरूषोत्तम महिन्याचे (आधिक मास) औचित्य साधून हा श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे कोपरखैराणे येथील ज्ञानविकास संस्थेच्या शाळेच्या मैदानावर हा ज्ञान यज्ञ सप्ताह संपन्न होणार आहे. सांयकाळी 6 ते 9 या वेळेत हा सप्ताह होणार असून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आई वत्सला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. भाऊशेठ म्हात्रे परिवार या श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे संयोजक आहेत.
प.पू. श्री. इंद्रदेवजी महाराजांच्या (मथुरा निवासी) रसाळ प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली, वाशीसह नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आई वत्सला प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी केले आहे.