* रौप्य पदक पटकावणार्या वैशाली पाटीलचा केला सन्मान
हरेश साठे
पनवेल : नगरपरिषदेचे नगरसेवक रमेश गुडेकर यांच्यावतीने समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वहयांचे वाटप करण्यात आले.यावेळी राज्य शासनाने हिंदी नाट्य स्पर्धेत रौप्य पदक पटकावणार्या पनवेलची कन्या वैशाली पाटील हिचा सन्मान करण्यात आला .यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश कोळी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लागावा या उद्देेशाने दरवर्षी पनवेल मधिल नगरसेवक रमेश गुडेकर मोफत वह्यांचे वाटप करीत असतात. रमेश गुडेकर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.तसेच शासनाच्या ५४ व्या नाटय महोत्सवात पनवेलची कन्या वैशाली पाटील हिने हिंदी नाट्यस्पर्धेत सारी रात या नाटकातील अभियनासाठी सांस्कृतिक कार्य संचानलयातर्फे रौप्य पदक व रोख रक्कम पाच हजार रूपयांचे बक्षिस प्रदान केल्याबद्दल पनवेल नगरीतर्फे तिचा यावेळी शाल श्रीफळ व भेटवस्तू देउन सन्मान करण्यात आला.
यावेळी पनवेलच्या नगरसेविका सुनंदा पाटील, पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष रत्नाकर पाटील़, खजिनदार अनिल कुरघोडे, बाळू जुमलेदार, ़विक्रम बाबर, क़ुणाल लोंढे, लक्ष्मण ठाकूर, दीपक घोसाळकर तसेच शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते.यावेळी बोलताना नगरसेवक रमेश गुडेकर म्हणाले की लोकप्रतिनिधी म्हणुन समाजातील गरीब व गरजू यथोचित सहकार्य करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो व कर्तव्यातील जाणिवेतुन मोफत वह्या व अन्य शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्याचे आयोजन करीत असतो.