हरेश साठे
पनवेल : पर्यावरण संवर्धन करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊन आणि इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१२ जुलै रोजी विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आले होते.
या कार्यक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनच्या वतीने पनवेल रेल्वे स्टेशन जवळील बीग बाजारच्या
तक्का गावाकडे जाणार्या रस्त्यावरील भव्य क्रिडांगणा सभोवताली ७० कडुनिंबाची रोपटी लावण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनचे सदस्य आ.प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनचे अध्यक्ष अरविंद सावळेकर, सेक्रेटरी सैफुद्यीन व्होरा, जितेंद्र बालड, निरज कोठारी, माजी अध्यक्ष हस्तीमल जैन, राजेंद्र ठाकरे, डॉ.प्रमोद गांधी आदींसहित पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नंतर किशोर चौधरी यांच्या काकाजीनुवाडी फार्म हाऊस मध्ये इनरव्हिल क्लब ऑफ पनवेलच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सर्व इनरव्हिल सदस्यांनी एक नारळाचे झाड लावले.यावेळी इनरव्हिल क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा वृषाली सावळेकर, सेक्रेटरी पोर्णिमा हळदीपूरकर तसेच क्लबचे प्रतिनिधी व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्टि ्रअल टाऊन व इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासाठी व शेती व बागायती फूलवण्यामध्ये गेली २० वर्षे काम करणार्या किशोर चौधरी यांच्या पत्नी भिकीबेन चौधरी यांना शाल -श्रीफळ व सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले, असिस्टंट गव्हर्नर को.ऑर्डीनेटर भगवान पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पूरस्कार देण्यात आला.
वृक्षारोपण कार्यक्रमाबरोबर दोन्ही क्लबच्यावतीने भात रोप लावणी कार्यक्रमात सहभाग घेत प्रत्यक्ष चिखलात उतरून सदस्यांनी भाताची रोपे लावून श्रमदान करण्याचा आनंद लूटला. या आगळ्या- वेगळ्या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना वृषाली सावळेकर यांनी श्रमदान कार्यक्रमामुळे सवारना शेतकर्यांच्या कष्टाची जाणीव झाल्याची भावना प्रकट केली. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रिअल टाऊनचे अध्यक्ष अरविंद सावळेकर यांनी ही वृक्षारोपण व भात रोप लावणी कार्यक्रमामुळे सर्व रोटरी सदस्यांनी एक आगळा -वेगळा अनुभव मिळाला असल्याचे सांगितले.