घनशाम कडू
उरण : सिडकोने १९७० साली चाणजे परिसरातील जागा संपादीत करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यातील काही जागा संपादीत करण्यात आली आहे. तर काही करावयाची आहे. याचाच ङ्गायदा येथील काही अध्यात्मिक बिल्डरांनी उचलत सिडकोच्या जागेची विक्री केल्या व त्यावर इमारती उभ्या करुन त्यांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे. तरी अशा प्रकारच्या विक्री किंवा इमारती उभ्या करण्यास कोणतीही परवानगी सिडकोने दिलेली नाही. तरी बिल्डरांच्या भुलथापांना बळी न पडता या ठिकाणची जागा अथवा घर घेताना ती आपल्या जबाबदारीवर घ्यावी. त्यास सिडको कोणत्याही प्रकारे जबाबदार रहाणार नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे चाणजे परिसरात जागा अथवा इमारतीमध्ये गाळा किंवा घर घेताना सावधान राहूनच व्यवहार करावा.
चाणजे परिसरातील जागाही सिडकोने संपादीत करण्याचा निर्णय १९७० साली घेतला आहे. उरणमध्ये जागेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याकारणाने काही अध्यात्मिकतेचा ओढा असलेल्या बिल्डर लॉबीने सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करुन त्याची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे,तर काही बिल्डरांनी सिडकोच्या जागेवर कोणतीच परवानगी न घेता मोठमोठ्या इमारती उभ्या करीत त्यामधील गाळे व घरांची विक्री करुन मोकळे झाले आहेत. याबाबत सिडकोकडे विचारणा केली असता अशा कोणत्याही प्रकारच्या जागा विक्री अथवा इमारती बांधण्यास कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. तसेच चाणजे परिसरात होणार्या कोणत्याही खरेदी-विक्री व्यवहारास सिडको जबाबदार रहाणार नसल्याचे सांगत ज्यावेळी सिडकोला गरज लागेल त्यावेळी त्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच सिडकोतर्ङ्गे करण्यात आले आहे.या सर्व बाबींचा विचार करुनच चाणजे परिसरात सिडकोचा ताबा असतानाही त्या ठिकाणच्या जागेचे सपाटीकरण करुन प्लॉट पाडून विक्रीचा व्यवहार जोरात सुरु आहे. तसेच काही जागेवर अनधिकृत इमारती उभ्या करुन त्यांची विक्री करण्यात आली आहे. काही वर्षापुर्वी येथील इमातरींवर कारवाईची नोटीस देवूनएका इमारतीवर कारवाईचा हातोडा चालवत अर्धवट बांधकाम तोडत कारवाईची मोहिम थांबविण्यात आली. ती आजतागायत थांबली आहे. त्यामुळे येथील दलाल आणि बिल्डर लॉबी सर्वसामान्य जनतेला कमी किंमतीचे आमिष दाखवत त्यांच्या गळी ही अनधिकृत जागा अथवा घर मारुन मोकळे होतात. सर्वसामान्य जनता कोणतीच शहानिशा न करता त्यांच्या अमिषाला बळी पडत आपल्या आयुष्याची पुंजी लावत अनधिकृत जागा अथवा घर घेवून मोकळे होतात. यावरुन सिडकोचे अतिक्रमण विभाग आणि येथील दलाल व बिल्डर यांचे अर्थपुर्ण संबंध असल्यामुळेच नवी मुंबईत कामोठे, खारघर, घणसोळी आदी ठिकाणी सिडकोकडून अतिक्रमणावर कारवाई होतअसताना उरणकडे मलई मिळेपर्यत दुर्लक्ष करीत रहातील त्यानंतर ते एकदिवस तरी हातोडा चालवतील अशी माहिती सिडकोच्या अतिक्रमण विभागातील एका अधिकार्यांने दिली. तरी चाणजे परिसरात जागा अथवा घर किंवा गाळे यांचा व्यवहार करताना पुर्ण कागदपत्रे आणि कायदेशीर परवानग्या बघूनच खरेदी कराव्यात. अन्यथा नंतर डोक्याला हात मारण्याची पाळी न येवो.