नवी दिल्ली : आयपीएलमधून चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघाना दोन वर्षासाठी निलंबित करण्याच्या निर्णयानंतर दुस-याच दिवशी चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चॅम्पियन्स लीग टी२० च्या गर्व्हनिंग कौन्सिलने ही स्पर्धा रद्द करण्याबाबतची माहिती दिली. त्यामुळे यंदाच्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये टी२० स्पर्धा होणार नाही.
२००९ मध्ये ही स्पर्धा सुरु करण्यात आली. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून या स्पर्धेचे आयोजन केली जात होती.
ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय कठीण होता. आतापर्यंत या स्पर्धेची सहा पर्व झाली आहेत. या स्पर्धेमुळे जगभरातील अनेक खेळांडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि बीसीसीआयने मिळून ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.