नवी मुंबई : आधुनिक शहर म्हणून नावाजले जाणारी नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापन अशा नागरी सुविधाविषयक अत्याधुनिक प्रकल्पांमुळे विविध स्तरावर नावाजली जाणारी आहे तसेच अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झाली आहे. अशाप्रकारे दर्जात्मक नागरी सुविधापुर्ती करीत असताना अधिक उत्तम सुविधा पुरविण्याकरीता व यामधून नागरी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानामध्ये सहभागी होत असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील 10 शहरांची निवड करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी करण्याकरीता नागरिकांनी सेवासुविधांबाबतच्या आपल्या मौल्यवान सूचना दि. 22 जुलै, 2015 पर्यंत मा. महापालिका आयुक्त यांचे नावे लेखी स्वरुपात महापालिका मुख्यालय, भूखंड क्र. 1, किल्ले गावठांणसमोर, सेक्टर 15 ए, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई 400614 या पत्त्यावर द्याव्यात.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सुजाण नागरिकांनी आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर, हरित व स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आपल्या मौल्यवान सूचना/अभिप्राय आवर्जुन नोंदवाव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.