संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून लाखो भारतीय युवकांना स्वयं रोजगार उपलब्ध होण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याच विचारांनी प्रेरित होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य योजना सुरु केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रथमच नवी मुंबईत आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांनी कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यासाठी सिडकोचे संचालक संजय भाटीया व कौशल्य विकास योजनेचे (स्किल डेवलपमेंट) चे सेक्रेटरी विजय गौतम यांच्याबरोबर नरीमन पॉइंटच्या निर्मल भवन येथे सिडको कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कौशल्य विकास योजनेच्या दृष्टीने विविध कौशल्य विकासावर चर्चा करण्यात आली. या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून नवी मुंबईतील हजारो बेरोजगार तरुणांना स्वयं रोजगार मिळवून देण्यासाठी सदर बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सिडकोचे संचालक संजय भाटीया यांनी सदर प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रासाठी ५ एकरचा भूखंड देण्याचे काबुल केले असून कौशल्य विकास योजनेचे सचिव विजय गौतम यांनी नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांनी सहभागी करून घेऊन त्यांच्या मार्फत बेरोजगार तरुणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन हजारो तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करून स्वयं रोजगार मिळवून देण्यासाठी महत्वाचे सहकार्य देण्याचे काबुल केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच नवी मुंबईत आमदार सौ.मंदा विजय म्हात्रे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल डेवलपमेंट योजनेला सुरुवात केली आहे.
नवी मुंबईच्या सायबर सिटीत प्रथमच ३० स्वच्छतागृहे आणि प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र (स्किल डेवलपमेंट स्कीम) सुरु होत असल्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांचे हजारो नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.