संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : पावसाळ्यात नवी मुंबई शहराला ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आजारांचा हमखास विळखा पडतो. नेरूळ सेक्टर सहा परिसरात डेंग्यूचा रूग्ण आढळल्याने साथीच्या आजारांने आपले अस्तित्व दाखविण्यास सुरूवात केल्याचे पहावयास मिळाले.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील प्लॉट 15 वरील सिडकोच्या बी टाईपच्या शिवम सोसायटीत राहणार्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्यांला डेंग्यूची लागण झाली आहे. शिवम सोसायटीत राहणार्या बी-4, बी विंगमधील 0:1 या सदनिकेतील स्नेहप्रभा सावंत यांच्या घरात राहणार्या प्रसाद नाटेकर (20) या मुलाला डेंग्यू झाला आहे. उपचारासाठी त्याला भायखळा सातरस्ता येथील कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती कळताच कोलवाणी माता मित्र मंडळाचे रहीवाशी मनोज मेहेर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांना कल्पना दिली. नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी घटनेचे गांभीर्य पाहता, डेंग्यूमुळे अन्य रहीवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधत तात्काळ उपाययोजना सुरू करण्याची मागणी केली.
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आरोग्य विभागाचे कर्मचार्यांनी येवून आपल्या कामास सुरूवात केली. आज (बुधवार, दि. 22 जुलै) आरोग्य खात्यातील कर्मचारी संपावर व मोर्चाला जाणार होते. नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी प्रथम शिवम सोसायटीत औषध व धुरफवारणी करा, मगच जा असे संबंधित कर्मचार्यांना सांगितले.
बुधवारी बी-4 , बी विंग करून गुरूवारी संपुर्ण सोसायटीत अळीनाशक व धुरीकरण केले जाणार असल्याचे आरोग्य कर्मचार्यांनी सांगितले. स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील व कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी समस्येचे गांभीर्य ओळखत केलेली धावपळ शिवम सोसायटीतील रहीवाशांनी जवळून पाहिली.