नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग अॅन्ड सोशल रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून तीन दिवसीय तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. 22 जुलै) मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर आणि शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ संपन्न झाला. या प्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, संस्थेचे प्रशिक्षण संचालक अनिल अग्रवाल, प्रशिक्षक प्रकाश शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानातही झपाट्याने बदल होत असून नवी मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांना या बदलांची म्हणजेच अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असावी याकरीता महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती देत शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी आपले नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी कडे गतीमान वाटचाल करीत असताना आपल्या अभियंत्यांनाही तशा स्वरुपाचे आधुनिक ज्ञान असावे यादृष्टीने ही कार्यशाळा लाभदायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी सर्व अभियंत्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपले ज्ञान वृध्दींगत करावे व त्याचा उपयोग शहराच्या विकासात करावा असे आवाहन केले.
आजपासून सुरु होणार्या या कार्यशाळेत – बिल्डींग मेंटेनन्स न्ड वॉटर प्रुफिंग, मॉडर्न ट्रेंन्ड इन डिझाईन अॅन्ड कंन्स्ट्रक्शन, रेडी मिक्स काँक्रिट, कंन्स्ट्रक्शन कॉस्ट एस्टिमेशन अॅन्ड बाईंडिंग, रिपेअर न्ड रिहॅबिलिटेशन ऑफ आरसीसी बिल्डींग, कंन्स्ट्रक्शन साईट कॅम्प मॅनेजमेंट, कॉस्टिक अॅन्ड परफॉर्मन्स या विषयावर आजच्या पहिल्या दिवशी प्रकाश शेजवळ, देवेद्र पांडे, गणपती किणी या मान्यवर व्यक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.
उद्याच्या सत्रात डीपीआर फॉर हायवे प्रोजेक्टस अॅन्ड टाईम मॅनेजमेंट, काँक्रिट टॉक, इनव्हॅायरमेंटल अॅन्ड सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ऑफ प्रोजेक्टस, इकॉनॉमिक नॅलिसीस, कॉस्ट बेनेफिट असेसमेंट, फायनॅनशियल नॅलिसीस ऑफ इन्व्हेस्टमेंट टू रिडयूस एटीसी लॉसेस, टाईल मास्टर या विषयावर प्रकाश शेजवळ, हितेश बारोट व राजेश यादव हे व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत.
दि. 24 जुलै च्या सत्रात प्रोजेक्ट मॅनेजमेंट ओव्हर व्हयू, व्हाईट टॉपिंग अॅन्ड काँक्रिट पेव्हमेंन्टस, प्रोजेक्ट लाईफ सायकल, टाईम कॉस्ट अॅन्ड स्कोप, स्मार्ट स्टिल बिल्डींग्ज फॉर स्मार्ट सिटीज या विषयांवर हॅरी चढढा, अश्विन मोघे, बिजू जॉन हे अनुभवी व्याख्याते माहिती देणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ अभियांत्रिकी ज्ञानात भर घालण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.