आमदार मंदा विजय म्हात्रे यांच्या हस्ते सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन
संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला स्वच्छ भारत घडविण्यासाठी पहिले यशस्वी पाऊल टाकण्याचा महाराष्ट्रातील पहिला मान बेलापूरमतदार संघाला प्राप्त होत असल्याने लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या व येथील जनतेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे, असे उद्गार आमदार मंदाताई विजय म्हात्रे यांनी बेलापूर, सेक्टर 15 येथील सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनाप्रसंगी काढले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असणार्या राज्यातील प्रथम सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन बेलापूर मतदार संघातील प्रभाग क्रमांक 107 येथे आमदार मंदाताई विजय म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूरक बाबी असून स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून होत असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उपायुक्त (घ.व्य.) बाबासाहेब राजळे, महापालिका भाजपा पक्षप्रतोद रामचंद्र घरत, स्थानिक नगरसेवक दिपक पवार, समाजसेवक विजय घाटे, श्रीराम घाटे, डॉ. राजेश पाटील, शैलजा पाटील, उज्वला बेल्हेकर, कामेश्वर सिंग, दत्ता घंगाळे, रविशंकर अय्यर, कुंदन म्हात्रे, सौ. शर्मिला शंकर, सतीश अग्रवाल, बि. के.मोहन, प्रकाश खलाटे, संतोष चव्हाण, स्थानिक रहिवासी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.