मुंबई : चर्चगेट स्थानकात अपघात हा फास्ट ट्रेन पकडण्याच्या गडबडीत असलेला मोटरमन ब्रेक लावण्याचं विसरल्याने झाला, असा चौकशी अहवाल रेल्वेने सोपवला आहे. रेल्वे प्रशासनाने या अपघाताला मोटरमन एल.एस. तिवारी यांना दोषी ठरवलं आहे. 50 पानांचा अहवाल आहे. पण अहवालात दोषी ठरवलेल्या मोटरमन तिवारींवर काय कारवाई होणार याबद्दल मात्र रेल्वे अधिकारी मौन बाळगून आहेत.
अपघाताच्या दिवशी चर्चगेट स्थानकात येताना तिवारींनी लोकलला ब्रेक लावलेच नाहीत. आणि यावेळी शेजारच्या प्लॅटफॉर्मवर विरारला जाणारी फास्ट लोकल उभी होती. आणि घरी जाण्यासाठी घाईघाईत तिवारींनी स्थानकात येताच लोकला ब्रेक लावले नाहीत, असं चौकशी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तसंच स्थानकात प्रवेश करत असताना लोकल ड्रायव्हिंगचे साहित्य जमवण्याचं सोडून तिवारींनी आपलं सामान आवरू लागले. त्यामुळे हा अपघात तिवारींच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, असा ठपका चौकशी अहवालातून मोटरमनवर ठेवण्यात आला आहे.