नवी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आधार कार्ड सप्ताह राबविण्याचा स्तुत्य प्रयास असून नवी मुंबईतही शिवसेना नगरसेवकांकडून व पदाधिकार्यांकडून ठिकठिकाणी अशाच प्रकारच्या लोकोपयोगी कार्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी शिवसेना शाखेजवळ 26 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपनेते नाहटा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी नाहटा बोलत होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, नगरसेवक काशिनाथ पवार, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, विभागप्रमुख गणेश घाग, महिला विभाग संघठक सत्वशीला जाधव, शाखाप्रमुख बाळू घनवट, शाखा क्रं. 84चे शाखाप्रमुख राजेश पुजारी आदी उपस्थित होेते.
नगरसेविका सुनिता मांडवे यांनी काही दिवसापूर्वी शालेय बालकांच्या माध्यमांतून वृक्षारोपण, आता आधार कार्ड सप्ताह असे विविध उपक्रम राबवित असल्याबाबत उपनेते नाहटा यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेच्या विविध कार्याची माहिती देत नगरसेविका सुनिता मांडवे व माजी नगरसेवक रतन मांडवे हे सातत्याने प्रभागात घरटी जनसंपर्कावर व लोकोपयोगी कामावर भर देत असल्याचे सांगितले.
माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी नवी मुंबईतच नाही तर नेरूळ परिसरातही आधार कार्डपासून अनेकजण आजही वंचित असल्याने वाढदिवसाचे औचित्य राबवून हा सप्ताह आयोजित केला असल्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.
यावेळी युवा शाखाधिकारी विशाल गुंजाळ, शरद पाजांरी, राजाभाऊ बोबडे, गौतम शिरवाळे, डॉ. उज्जैनकर, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, कुंभारकर, गणेश सावंत, शेखर बोरकर, हेमंत पोमण, अनुभव बेळे, कल्पना पांजारी, जयश्री बेळे, शुभांगी परब, जयश्री गावडे आदी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.