पिंपरी : भाजप जातीयवादी विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी फुले-शाहु-आंबेडकरांची आहे. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही. जर विश्वास बसत नसेल, तर स्टँपवर लिहून देऊ का? अशी फटकेबाजी करीत शिवसेनेच्या मनात आहे. तोपर्यंत हे सरकार चालेल, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डी येथे पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीनंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शंकुतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे होते. पवार म्हणाले, मध्यावधी निवडणुका लागतील असे पिल्लू आम्ही कधीच सोडले नाही. बहुमतासाठी भाजपने शिवसेनेचा पाठिंबा घेतला आहे. भाजप आणि शिवसेनेचे एकमेकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामध्ये आम्ही बोलण्याचा काहीही संबंध नाही. तो त्या-त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपने बहुमतासाठी शिवसेनेचा पिांठंबा दिला आहे त्यामुळे शिवसेनेच्या मनात जोपर्यंत आहे तोपर्यंत ते सरकार राहिल. जर शिवसेनेने पाच वर्ष पाठिबा दिला तर सरकार पाच वर्ष राज्य करेल याचा अर्थ आम्ही मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू सोडले असा होत नाही. आम्ही भाजपाला बहुमतासाठी कधीही पाठिंबा देणार नाही. जातीयवादी पक्षाला आमची साथ राहणार नाही. असा विचारही कधी केला नाही.
सरकार स्थापनेच्या वेळी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता असे विचारले असता पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था होती. त्यामुळे तात्पुरता अवस्थेत पाठिंबा दिला होता. बाहेरून पाठिंबा दिला म्हणजे आमची त्यांना साथ नाही. तात्पुरती साथ द्यायची नाही. माग दुसर्या दिवशी निवडणूक जाहीर करायची का? असा प्रति प्रश्न करून पवार म्हणाले की, आम्ही कधीही भाजपला पाठिंबा देणार नाही. त्यासाठी स्टँपवर लिहून देऊ का? अशी फटकेबाजी करीत. सरकार आहे तोपर्यंत आम्ही विरोधात बसून शेतकर्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयाला विरोधच करणार आहोत.