मुंबई : बॉलिवूडमध्ये बार्बी गर्लचा किताब मिळवणारी कतरिना कैफ आपले सोंदर्य जपण्यासाठी नेहमीचं सर्तक असते. यासाठी मायकल जॅक्सन जे तंत्र वापरत होता तेच तंत्र कतरिनाही वापरते आहे.
कतरिनाचे ब्यूटी सिक्रेट समजले आहे. ती नियमितपणे ऑक्सिजन थेरुपी घेते आहे.या थेरपीचे नाव हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) असे आहे, त्यासाठी कतरिनाला 20 हजार रूपये खर्च करावे लागतो.
यात पेशंटला प्रेशराईज्ड चेंबरमधून शुद्ध ऑक्सिजन दिले जाते. उन्हामुळे त्वचेचे फार नुकसान होते. त्वचा पूर्ववत होण्यासाठी तसेच रंग निखारण्यासाठी या थेरपीचा उपयोग केला जातो.
याच्या एका सिटींगला 20 हजार रूपयांचा खर्च येतो. बॉलिवूडमध्ये आताचं पाऊल ठेवणारी सुनील शेट्टींची मुलगी अथिया ही सुद्धा एचबीओटी ची थेरपी घेते.