नवी मुंबई : ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एक ऑगस्ट रोजी असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही शुभेच्छांचे बॅनर, होर्डींग्ज लावू नयेत असे आवाहन केले आहे.
होर्डींग्ज, बॅनर लाऊन शहर विद्रुप करण्यापेक्षा वेबसाईटवर तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन त्यानी कार्यकर्ते व हितचिंतकांना केले आहे. पंजाबमध्ये नुकताच झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यात बळी गेलेले पोलीस व नागरिक तसेच माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने देश आधीच हळहळत आहे. अशा परिस्थितीत साधेपणाने आपण वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन राजन विचारे यानी केले आहे. वाढदिवसानिमित्त होर्डींग्जच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्याच्या भावनांचा आपण आदर करीत असून होर्डींग्जमुळे शहर विद्रुप होते. त्यासाठी कोणीही होर्डीग्जबाजी करू नये असे आवाहन खासदारानी केले आहे.