* आषाढी वारी निमित्त शासनाच्या विकास योजनांचा जागर
गणेश पोखरकर
कल्याण : केंद्र आणि राज्यशासनाच्या अनेक लोकउपयोगी योजनांपासून वंचित असलेल्या सामान्य जनतेला योजनांशी जोडण्यासाठी आणि जनतेच्या सहकार्याने विकाससाधण्यासाठी सोमवारी 27 जुलै रोजी आषाढी एकादशीचे निमित्त साधून कल्याण भाजपा जिल्ह्याच्यावतीने दिंडी विकासाची या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्रि्चम विभगात काढण्यात आलेल्या दिंडी विकासाची अभिनव उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होऊन कल्याणकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवीला. या दिंडी सोहळ्यात वारकरी आणि पारंपारिक वेशात शालेय विद्यार्थी, वारकरी भजनी मंडळे, अनेक सामाजिक सेवाभावी संस्था, ढोल – लेझीम पथके आणि नागरिक सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यात चित्ररथाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या सोहळ्याचे नेतृत्व आमदार नरेंद्र पवार यांनी केले. त्यांच्या समवेत भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संजीवनी पाटील, कल्याण शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे, नगरसेविका उपेक्षा भोईर, नगरसेविका डॉ. शुभा पाध्ये आदी मान्यवर आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
त्रिभुवनातील वारीचा दिंडी सोहळ्याचा आनंद कल्याणकरांना देखील आपल्या शहरात अनुभवता येण्यासाठी कल्याण भाजपा जिल्ह्याच्या माध्यमातून भाजपा प्रदेश सचिव आमदार नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून दिंडी विकासाची या दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या उद्देशाने कल्याण शहराच्या नियोजित विकासावर भाष्य केले गेले होते. त्याचप्रमाणे शासनाच्या विकास योजनांचा देखील जागर करण्यात आला. या मंगलमय सोहळ्यात पारंपारिक आणि वारकरी सांप्रदायिक वेशात कल्याणकरांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आव्हान आमदार पवार यांनी केले होते. या आव्हानाला कल्याणकरांनी उस्फुर्त साद देत, ते या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले. सावळ्या विठूरायाची भव्य मूर्ती या दिंडी सोहळ्यातील प्रमुख आकर्षणाचा विषय ठरला. या निमित्ताने केंद्र आणि राज्य शासनाच्या जनसामान्याच्या विकास योजना, शासनाचे लोकउपयोगी निर्णय आणि कल्याण शहराच्या नियोजित विकासाच्या आराखड्याचे प्रदर्शन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आले. या दिंडी सोहळ्यातून सामाजिक प्रश्नावर विकासाचे धोरण कल्याणकरां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे या नयनरम्य दिव्य सोहळ्यात कल्याण तालुक्यातील वारकरी भजनी मंडळे देखील सहभागी झाले. यावेळी भजनाच्या तालावर आमदार नरेंद्र पवार यांनी ठेका धरत वारकरी आणि कार्यकर्त्यां समवेत पावल्या – फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.
दरम्यान या दिंडी सोहळ्याची सुरुवात सायंकाळी 4.00 वाजता न्युमानिषानगर बेतूरकर पाडा येथील संत गजानन महाराज मंदिर येथून करण्यात आली. तर पुढे हा दिंडी सोहळा इंद्र्प्रस्थ, मुरबाड डायव्हर्जन रोड, वायले नगर, खडकपाडा सर्कल, बेतूरकर पाडा चौक, वीर कोतवाल चौकाकडून उजवीकडे, सहजानंद चौक, शिवाजी चौक विठ्ठल मंदिर, येथून सुभाष मैदान येथे रिंगण सोहळा होऊन समाप्त झाला.